सावकार फार्मसी कॉलेज जैतापूर, सातारा व अरविंद गवळी कॉलेज ऑफ फार्मसी जैतापूर सातारा महाविद्यालाच्या तेजोमय २०२० या कॉलेज मॅगझीन व वार्षिक अहवालाचे प्रकाशन दिनांक १२ जुलै, २०२१ रोजी संस्थेचे चेअरमन श्री. अरविंद गवळी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. पी जे शिरोटे, डॉ. व्ही वाय लोखंडे, संपादक श्री. व्ही. एस. मारुलकर, श्री. एस. व्ही. अभंग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थयांनी शैक्षणिक वर्ष २०२० मध्ये प्रकाशन विभागाकडे विविध सायंटिफिक व इतर विषयांवर जमा केलेल्या निवडक लेख, कविता, छायाचित्र, पैंटिंग्स, स्केटचेस यांचा समावेश तेजोमय २०२० मध्ये केला आहे.
II सर्वे भवन्तु सुखींन: II या थिम वर मासिकाची निर्मिती केली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. जे. शिरोटे यांनी केली. एन्टीबायोटीकचा चा अति वापर व त्यायोगे भविष्यात तयार होऊ घातलेले 'सुपरबग' यावर आधारित साहित्य विद्यार्थयांनी सादर केले आहे.
समाजप्रबोधन करण्याच्या उद्देशाने मॅगझीनचे प्रकाशन स्तुत्य असल्याचे संस्थेचे चेअरमन अरविंद गवळी यांनी आपल्या मनोगतात सांगितले. विद्यार्थ्यांना स्वता :च्या भावना व्यक्त करण्यासाठी असे अनेक उपक्रम समाज माध्यमाचा सुयोग्य वापर करून भविष्यात योजण्याचा मानस असल्याची प्रतिक्रिया संस्थेचे सेक्रेटरी श्री. निशांत गवळी यांनी दिली.